रिक्षा पंचायत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:34+5:302021-03-14T04:29:34+5:30
शिरूरघाट येथे भूमिपुत्रांचा सत्कार बीड : केज तालुक्यातील शिरूरघाट येथील भारतीय रेल्वेत कार्यरत वरिष्ठ अभियंता संजय नारायण शिंदे व ...

रिक्षा पंचायत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
शिरूरघाट येथे भूमिपुत्रांचा सत्कार
बीड : केज तालुक्यातील शिरूरघाट येथील भारतीय रेल्वेत कार्यरत वरिष्ठ अभियंता संजय नारायण शिंदे व शिक्षक दिलीप निवृत्ती शिंदे या दोन भूमिपुत्रांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सरपंच मच्छिंद्र सांगळे, ॲड. भालचंद्र घोडके, प्रा. जगन्नाथ मिसळे, जयद्रथ गायकवाड तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणाधिकाऱ्यांची डिघोळआंबात भेट
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील जि.प.मा. प्रशाला डिघोळआंबा येथे १२ मार्च रोजी शालेय पोषण आहार वाटपासंदर्भात गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, शालेय पोषण आहार तालुकाप्रमुख सुंदर नेहरकर यांनी भेट दिली. मुख्याध्यापक बी.वाय. जोगदंड, शेख सिराज यांनी त्यांचा यावेळी सत्कार केला.
ठाणे परिसराची पोलिसांकडून सफाई
बीड : तालुक्यातील युसूफवडगाव ठाणे व परिसराची स्वच्छता करण्यात आली. सपोनि आनंद झोटे यांनी पुढाकार घेतला. यावेळी सपोनि विजय आटोळे, फौजदार सीमाली कोळी, पोना बालासाहेब ढाकणे, पांडुरंग वाले, परमेश्वर शिंदे, जनार्दन कांबळे, अंगद पिंपळे, बी.आर. साठे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.