माकड समोर आल्याने रिक्षा उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:37+5:302021-07-20T04:23:37+5:30
माजलगाव : तालुक्यातील लोणगाव परिसरात ऑटो रिक्षासमोर अचानक माकड आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात गजराबाई ...

माकड समोर आल्याने रिक्षा उलटली
माजलगाव : तालुक्यातील लोणगाव परिसरात ऑटो रिक्षासमोर अचानक माकड आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात गजराबाई हरिभाऊ हजारे ( वय ६०) नामक वृद्ध मजूर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतातील खुरपणीची कामे जोरात सुरू आहेत. यामुळे शेतात काम करणाऱ्या मजूर महिला भेटत नसल्याने शेतकरी त्यांना वाहनाद्वारे येण्या-जाण्याची सोय करत आहेत. लोणगाव येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास याच गावातील ऑटो रिक्षा लोणगाव-जीवनापूर रस्त्यावरून जात असताना समोरून अचानक रिक्षासमोर माकड आल्याने चालकाचा रिक्षावरील ताबा सुटला व रिक्षा उलटून बाजूच्या खड्ड्यात गेली.
या रिक्षात असलेल्या गजराबाई हजारे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागीच मरण पावल्या. या अपघातात नंदिनी अशोक हजारे (वय १४) या मुलीच्या दोन्ही पायाला मार लागल्याने तिला माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिक्षातील २-३ महिला किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर लोणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.
190721\purusttam karva_img-20210719-wa0046_14.jpg