कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:58+5:302021-03-06T04:31:58+5:30
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. ...

कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता गृहविलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत. सार्वजनिक स्वरूपाचे मेळावे आणि संमेलने बंद करण्यात येणार आहेत तर आंदोलनात फक्त पाच व्यक्तींना नियम पाळून मुभा देण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. कोरोना होऊ नये यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
हे अधिकारी घेणार निर्णय
शहरी भागात कंटेन्मेंट झोनचा निर्णय मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी घेणार आहेत. मात्र, तालुका आरोग्य अधिकाऱ्याला ही माहिती तहसीलदारांना तात्काळ द्यावी लागणार आहे. तसेच शिथिलता झाल्यानंतर त्याचेदेखील वेळेत काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.