लोकांनी केलेल्या सन्मानामुळे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:30+5:302021-07-12T04:21:30+5:30
अंबाजोगाई : रुग्णसेवा हे आमचे कर्तव्यच आहे, तरीही समाजातील लोक एकत्रित येऊन डॉक्टरांचा आदरपूर्वक सन्मान करतात. हाच सन्मान रुग्ण ...

लोकांनी केलेल्या सन्मानामुळे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते
अंबाजोगाई : रुग्णसेवा हे आमचे कर्तव्यच आहे, तरीही समाजातील लोक एकत्रित येऊन डॉक्टरांचा आदरपूर्वक सन्मान करतात. हाच सन्मान रुग्ण सेवा करण्यासाठी नवीन ऊर्जा देतो, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले.
अंबेजोगाई इनरव्हील क्लबच्या वतीने येथील सद्भाव रुग्णालय परिसरात कोरोना काळात दिवसरात्र काम करून, रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बिराजदार बोलत होते.
यावेळी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.शुभदा लोहिया, डॉ.चंद्रकांत चव्हाण, डॉ.संदीप थोरात, डॉ.अरुणा केंद्रे, डॉ.अनिल मस्के, डॉ.बालासाहेब लोमटे, डॉ.अपर्णा कुलकर्णी, डॉ.सविता तोष्णीवाल, डॉ.गौरी कुलकर्णी, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.निशिकांत पाचेगावकर, डॉ.नयन लोमटे, डॉ.अमित लोमटे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शहरातील नामांकित डॉक्टर्स व इनरव्हीलच्या चंद्रकला देशमुख, सुहासिनी मोदी सुरेखा सिरसाट, अनिता सुराणा, वैजयंती टाकळकर, रेखा शितोळे, अनिता सुराणा व अर्चना मुंदडा उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली चरखा यांनी केले. संचलन शोभा रांदड यांनी तर आभार मेघना मोहिते यांनी मानले.
110721\img-20210705-wa0025.jpg
रोटरी इनर्व्हील क्लब च्या वतीने कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला