केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:42+5:302021-02-06T05:02:42+5:30

निवडणुकीसाठी ११४ सरपंचपदांची सोडत केज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी ...

Reservation of Sarpanch posts of 114 Gram Panchayats in Cage taluka announced | केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर

केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर

निवडणुकीसाठी ११४ सरपंचपदांची सोडत केज येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली. ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित

जमातीच्या प्रवर्गासाठी ७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेले आरक्षण

कायम ठेवण्यात आले आहे.

सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वा. केज तहसील कार्यालयात तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्या आदेशानुसार काढण्यात आली. यावेळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस, नायब तहसीलदार सुहास हजारे, अव्वल कारकून पठाण, मन्मथ पटणे आदींच्या उपस्थितीत सहा वर्षीय शर्वरी सचिन गोसावी हिच्या हस्ते सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. अनुसूचित जातींच्या महिलांसाठी जिवाचीवाडी, बोबडेवाडी, राजेगाव, सारणी (सांगवी), दरडवाडी, घाटेवाडी, काशीदवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, आंधळे, तर अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रवर्गासाठी दैठणा, लिंबाचीवाडी, जोला, डोणगाव, पिट्ठीघाट, सावळेश्वर, मुंडेवाडी, शिरपुरा सातेफळ आरक्षण पडले आहे. अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता वरपगाव/कापरेवाडी, तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या प्रर्वगासाठी रामेश्वरवाडी/ढाकणवाडी या ग्रामपंचायतींचे आरक्षण ७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आल्याने यामध्ये बदल करण्यात आला नाही. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी

आनेगाव, कोरडेवाडी, सांगवी-सारणी, सारुळ, सुर्डी, बेलगाव/केळगाव, देवगाव,

जाधवजवळा, सोनिजवळा, धर्माळा, शिरूरघाट,/गदळेवाडी, धोत्रा, युसूफवडगाव,

केवड, चंदनसावरगाव, आणि जानेगाव तर कोठी, कानडीबदन, सासुरा, नागझरी,

काळेगावघाट, बानेगाव, भालगाव, ढाकेफळ, कासारी, कानडीमाळी, वाघेबाभूळगाव,

इस्थळ, कुंबेफळ, माळेवाडी, लाखा ही गावे नामप्र महिलांसाठी आरक्षित

करण्यात आलेली नाहीत.

सर्वसाधारण महिलांसाठी ३२ पदे आरक्षित

आडस, आनंदगाव (सा.), औरंगपूर, बनकरंजा, बावची, चिंचोली माळी/ सारकवाडी,

दहिफळ वडमवली, धनेगाव, गोटेगाव, होळ, जवळबन, कोल्हेवाडी, लाडेवडगाव,

माळेगाव, नाहोली, नायगाव, नारेवाडी, पैठण, साबला, सारणी (आं.), टाकळी,

तांबवा, उमरी, उंदरी, नांदूरघाट, डोका, शिंदी, सौंदना, भोपाला, भाटुंबा, आरणगाव आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नसलेली आवसगाव/वाकडी,

बनसारोळा, बोरगाव (बु.), दिपीडगाव, हादगाव, हनुमंत पिंप्री, कळमअंबा,

कौडगाव, केकतसारणी, कोरेगाव, केकणवाडी, लाडेगाव, मांगवडगाव, मसाजोग,

मोटेगाव, पळसखेडा, पाथरा, पिंपळगव्हाण, पिराचीवाडी, सादोळा, सोनेसांगवी,

सुकळी, तरनळी, विडा/गौरवाडी, येवता, बोरीसावरगाव, मुलेगाव, शेलगाव-गांजी,

साळेगाव, लव्हुरी आणि पिसेगाव या गावांच्या सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत

जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: Reservation of Sarpanch posts of 114 Gram Panchayats in Cage taluka announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.