शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कत्तलीसाठी जाणाऱ्या १३ बैलांची सुटका; बीड ग्रामीण पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:12 IST

रात्रीच्या गस्त घालणाºया बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका ट्रकमधून हैदराबादकडे कत्तलीसाठी नेण्यात येणाºया तेरा बैलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास गेवराई - बीड रोडवर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रात्रीच्या गस्त घालणाºया बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका ट्रकमधून हैदराबादकडे कत्तलीसाठी नेण्यात येणाºया तेरा बैलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास गेवराई - बीड रोडवर करण्यात आली.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून मुश्ताक नामक व्यक्तीने कत्तल करण्याच्या उद्देशाने तेरा बैलांची खरेदी करून त्यांना ट्रकमध्ये (एमएच ०४ ईवाय १८०) घालून हैदराबादकडे पाठविले असल्याची गुप्त माहिती बीड ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बीड - गेवराई मार्गावर रामनगर येथे नदी पुलावर सापळा रचला. त्यानंतर पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एक ट्रक संशयास्पद रीतीने गेवराईकडून बीड कडे येताना पोलिसांना दिसून आला. नंबरच्या आधारे टीप मिळालेला हाच ट्रक असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यास अडविले. ट्रकच्या मागील बाजूची ताडपत्री काढून झडती घेतली असता आतमध्ये तेरा बैल आढळून दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने सदरील बैल मालेगाव येथील मुश्ताक याने खरेदी केले असून ते मी हैदराबादला कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले.पोलिसांनी बैल आणि ट्रक असा एकूण सव्वा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चालक अहमद मोहम्मद सलीम (रा. मंगळवार वार्ड, मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेऊन पोलीस कर्मचारी राजाभाऊ गर्जे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे, पोलीस कर्मचारी राजाभाऊ गर्जे, सचिन सिद्धेश्वर, भागवत शेलार आणि चालक रशीद खान यांनी पार पाडलीजनावरे चोर जेरबंद; दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरीधारूर तालुक्यातील आमला येथील शेतकºयाचे बैल चोरीला गेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या चोरीचा दरोडा प्रतिबंधक पथाने दहा दिवसात छडा लावला.२८ सप्टेंबर रोजी आमला येथील शेतकरी मधुकर रामकिसन सोळुंके यांच्या गोठ्यातून दोन बैल चोरी झाले होते. याबाबत सिरसाळा पोलिसांनी सदरील बैल चोरून नेत असलेल्या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर चोरट्यांनी बैलासह वाहन जागेवर सोडून पळ काढला होता.रविवारी दरोडा प्रतिबंधक पथकाला चोर उमापूर फाटा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हॉटेलातून बप्पासाहेब पंडित कोळेकर आणि रमेश होणाजी सावंत (दोघेही रा. रामनगर तांडा, ता. गेवराई) यांना जेरबंद केले. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी राजाभाऊ नागरगोजे, संजय खताळ, प्रकाश वक्ते, श्रीमंत उबाळे, नारायण साबळे यांनी पार पाडली.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी