पाटोदा विद्यालयात प्रजासत्ताकदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:47+5:302021-02-05T08:25:47+5:30
बीड : येथून जवळच असलेल्या बेलखंडी पाटोदा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात ...

पाटोदा विद्यालयात प्रजासत्ताकदिन साजरा
बीड : येथून जवळच असलेल्या बेलखंडी पाटोदा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक धनवंत मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
ढेकळे विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात
गेवराई : तालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषिपंडित भागुजीराव ढेकळे विद्यालयात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब थिटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक रावसाहेब भोसले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
येळंबघाटमध्ये कार्यक्रम
बीड : तालुक्यातील येळंबघाट येथील बळवंतराव कदम विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ प्रा. रा.का. कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संविधान प्रास्ताविकेचे वाचनही झाले. प्राचार्य रामहरी कदम, उपमुख्याध्यापक राम कदम, पर्यवेक्षक बी. के. खाकरे, व्ही. एस. चौरे, ज्येष्ठ लिपिक एम. एस. वाघ उपस्थित होते.
डोमरीत झेंडावंदन
पाटोदा : तालुक्यातील डोमरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन झाले. झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना खाऊचे वाटप झाले. उद्योजक सी. जी. आगलावे, सरपंच नारायणराव भोंडवे, डॉ. सारिका माने, शिक्षक, कर्मचारी यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला.
डिघोळआंबात कार्यक्रम
अंबाजोगाई : तालुक्यातील जि.प. माध्यमिक शाळा डिघोळ आंबा प्रशाला येथे प्रजासत्ताकदिन संपन्न झाला. मुख्याध्यापक बी. वाय. जोगदंड यांनी ध्वजारोहण केले. श्रीराम सोनवणे, उपसरंपच संगीता खरात, मिलिंद खरात, भरत सोनवणे, सी.एन. कवडे, एस. बी. म्हेत्रे, आडे आर. एल., विक्रम चव्हाण आदी उपस्थित होते.
झेंडावंदन कार्यक्रम
बीड : शहरातील शिवाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी शकुंतला लोळगे, बी.टी. बहीर, ॲड. हेमंत औटे, आसाराम सुर्वे, बी.बी. बोरखेडे, माजी लिपिक रांजवन, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, उपमुख्याध्यापक राजकुमार कदम, पर्यवेक्षक बिी. डी. मातकर आदी उपस्थित होते.
झेंडावंदन उत्साहात
परळी : येथील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्रा. टी. पी. मुंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते जनार्दन गाडे, नरहरी काकडे, प्रा. अवस्थी, फुलारी, भीमराव मुंडे, दत्तात्रय ढवळे, रघुनाथ डोळस, विश्वनाथ देवकर आदी उपस्थित होते.
‘सरस्वती’मध्ये कार्यक्रम
बीड : शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे सचिव माननीय उत्तम पवार सर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्याध्यापक प्रशांत पवार, प्रशासन अधिकारी नंदकुमार उघाडे, मुख्याध्यापक जरांगे, प्रवीण पवार, प्रफुल्ल पवार यासह काही पालकही उपस्थित होते.