गाजीपूरमधे प्रजासत्ताक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:40+5:302021-02-05T08:25:40+5:30
शिरूर कासार : तालुक्यातील गाजीपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण व ...

गाजीपूरमधे प्रजासत्ताक दिन साजरा
शिरूर कासार : तालुक्यातील गाजीपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण व सर्वांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. पोलीस पाटील पंढरीनाथ उगले हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा ग्रामस्थ व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गेवराईचे पो. नि. नागरे यांच्यासह मुख्याध्यापक ढाकणे, सहशिक्षक भोसले, ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.
जयंतीनिमित्त कार्यक्रम
बीड : ३१ जानेवारी रोजी संत नामदेवनगर, धानोरा रोड या भागामध्ये सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले असून, सहभागी व्हावे, असे आवाहन मानवी हक्क अभियानचे राज्य अध्यक्ष मधुकर लोंढे यांनी केले.
खड्डे वाढल्यामुळे नागरिक त्रस्त
केज : तालुक्यातील नांदूरघाट परिसरातील गावांमध्ये खड्डे वाढले आहेत. त्यामुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
चोऱ्यांमध्ये होतेय वाढ
रायमोहा : शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा आणि परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थ रात्रभर जागून पहारा देत आहेत. या भागात पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी होत आहे.
वाहतूककोंडी
अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते सायगाव नाका या प्रशांतनगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले असून, या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून वाहतुकीची कोंडी दूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशांनी केली आहे.