लघु प्रकल्पांची दुरुस्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:47+5:302021-03-06T04:31:47+5:30
मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरे रस्त्यावरच ठाण ...

लघु प्रकल्पांची दुरुस्ती रखडली
मोकाट गुरांचा रस्त्यावर ठिय्या अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेली असतात. रस्त्याच्या मधोमध ही जनावरे बसत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ व गुरांचा ठिय्या यामुळे वाहतूक व्यवस्था अनेकदा कोलमडते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गुरांना रस्त्यातून हटवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आठ दिवसांआड पाणी पुरवठा
अंबाजोगाई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याने वेळी-अवेळी केव्हाही पाणी सोडले जाते. कोणत्याच प्रभागाचा पाणी सोडण्याचा दिवस ठरलेला नसल्याने मनमानी पाणी सोडले जाते. मुबलक पाणीसाठा असूनही आठ दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.