लोकसहभागातून मारुती मंदिराचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:18+5:302021-03-21T04:32:18+5:30
मंदिराच्या समोरील प्रांगणात झाडे लावण्यात येणार आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या शहरातील नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बाकांची व्यवस्था केली जात आहे. ...

लोकसहभागातून मारुती मंदिराचा जीर्णोद्धार
मंदिराच्या समोरील प्रांगणात झाडे लावण्यात येणार आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या शहरातील नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बाकांची व्यवस्था केली जात आहे. या मंदिराचे संपूर्ण काम शहरातील राजू अग्रवाल यांनी स्वतः हजर राहून चांगल्या प्रकारे करून घेतले. मागील चार ते पाच वर्षांपूर्वी याच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक मिळून जीर्णोद्धार करण्याचे ठरविले होते. मोठी बैठक बसली होती. संपूर्ण गाव बंद करून बैठक झाली होती. त्या बैठकीदरम्यान काही रोख स्वरूपात धनादेश जमा झाला होता. मात्र, हा धनादेश कोणाकडे आहे व त्या धनादेशाचे काय झाले, याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. मात्र, कोणीतरी चांगले काम करीत असेल तर त्याला मदत करणारे भरपूर असतात याची प्रचिती मंदिराच्या सध्या होत असलेल्या जीर्णोद्धार कामातून दिसून आली.
===Photopath===
200321\img-20210320-wa0273_14.jpg