‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:44 IST2018-12-03T23:44:22+5:302018-12-03T23:44:48+5:30

शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

'Religion must be observed in the tradition' | ‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’

‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’

ठळक मुद्देभीमाशंकरलिंग शिवाचार्यांचे मत : श्रीक्षेत्र कपिलधार येथे सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
श्रीक्षेत्र कपिधार येथे तपोरत्न प्रभूपंडिताराध्य गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास राजगुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, शंभूलिंग शिवाचार्य महाराज, डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, निळकंठ शिवाचार्य महाराज, दिगांबर शिवाचार्य महाराज, देशीकेंद्र चंद्रशेखर स्वामी उपस्थित होते. यावेळी रुद्राभिषेक सोहळा व धार्मिक कार्यक्रम झाले. जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, माजलगावकर महाराजांनी नेहमी परंपरा, सत्य आणि न्यायाला धरु न धर्मकार्य केले आहे. त्यांचे शरीर जरी थकले असले तरी ते मनाने मात्र चिरतरु ण असल्याचे जगदगुरुंनी सांगितले. कार्यक्र मासाठी वीरशैव समाजाने परिश्रम घेतले. या सोहळ्याला मराठवाड्यातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गुरुंचे स्थान श्रेष्ठ
श्रीक्षेत्र कपिलधारची जागा, जगद्गुरु ंची उपस्थिती असा संगम भाविकांना पाहायला मिळाला. गुरु ंचे स्थान सर्वश्रेष्ठ असते असे दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला वसमतकर यांनी सांगितले.

Web Title: 'Religion must be observed in the tradition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.