स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शनसाठी दिलासा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST2021-08-15T04:34:10+5:302021-08-15T04:34:10+5:30

आष्टी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एलपीजी कनेक्शन सोपवून उज्ज्वला योजनेचा दुसरा ...

Relief for Migrant Workers for LPG Connection - A | स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शनसाठी दिलासा - A

स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शनसाठी दिलासा - A

आष्टी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील महोबा येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एलपीजी कनेक्शन सोपवून उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन केवळ मोफतच मिळणार नाही, तर त्यांना पहिले रिफिल आणि शेगडीही मोफत मिळणार आहे. या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे नेते माजी आ. भीमसेन धोंडे यांनी केले आहे.

स्थलांतरितांना रेशनकार्ड किंवा कोणताही रहिवासी पुरावा सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. यासाठी स्वत:चे घोषणापत्र पुरेसे मानले जाईल. उज्ज्वला २.० योजनेमध्ये पंतप्रधान उज्ज्वला दुसऱ्या भागात अशा स्थलांतरित मजुरांसाठी विशेष तरतूद केली आहे. जे यापूर्वी रहिवासी प्रमाणपत्र अभावी या योजनेपासून वंचित होते. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आता स्थलांतरित मजुरांना एलपीजी कनेक्शन मिळण्यासाठी दिलासा देण्यात आला आहे. बीपीएल कार्डधारक कोणतीही महिला उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकते. जवळच्या एलपीजी सेंटरमध्ये अर्ज, केवायसी फॉर्म भरावा लागेल. अर्ज भरण्यासाठी नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदी आवश्यक कागदपत्रे आहेत, असे धोंडे म्हणाले.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या वेबसाईटवरून आपण पीएमयूवायचा अर्ज डाऊनलोड करू शकता. सवलतीच्या दरात स्वयंपाकाचा एलपीजी गॅस देणारी योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलेच्या नावे लाभ मिळतो. सरकार १६०० रूपये अनुदान देते, तर तेल कंपन्या १६०० रुपये ग्राहकांना कर्जस्वरूपात देतात. १४.२ किलोचे पहिले सहा सिलिंडर ईएमआय फ्री असून सातव्या सिलिंडर पासून ईएमआयची सुरुवात होईल. अर्जदाराकडे बीपीएल रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, राष्ट्रीय बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे, असेही या योजनेबाबत माहिती देताना धोंडे म्हणाले.

Web Title: Relief for Migrant Workers for LPG Connection - A