कोरोनाच्या प्रादुर्भावातही शाळाबाह्य मुलांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:38+5:302021-03-14T04:29:38+5:30
तालुक्यातील नव्हे, तर सर्व राज्यातील शिक्षकांना नेहमी पोलिओ डोस, जनगणना, मतदान नोंदणी, तसेच कोरोना काळात चेक पोस्ट, स्वस्त धान्य ...

कोरोनाच्या प्रादुर्भावातही शाळाबाह्य मुलांची नोंदणी
तालुक्यातील नव्हे, तर सर्व राज्यातील शिक्षकांना नेहमी पोलिओ डोस, जनगणना, मतदान नोंदणी, तसेच कोरोना काळात चेक पोस्ट, स्वस्त धान्य दुकान असो किंवा कोणताही सर्वे असो असे विविध प्रकारचे कामे फक्त आणि फक्त शिक्षकांना दिली जातात. वर्षभरापासून सर्व शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना ऑनलाईन अध्यापन करावे लागत आहे. त्यात भर म्हणजे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील शासनाच्या धोरणानुसार आता जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शिक्षकांना गाव, वाडी, वस्ती, तसेच शहरातील घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्व्हे म्हणजे नोंदणी करण्याचे काम करावे लागत आहे. प्रत्येक शिक्षक घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांची नाव नोंदणी करीत असल्याने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून होणारी नोंदणी, सर्व्हे शासनाने तत्काळ रद्द करावा, अशी मागणी होत आहे.
शासनाने सध्या तालुक्यातील वाडी, वस्ती, गावे, तसेच शहरातील प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांची नोंदणी सुरू आहे. हे काम शासनाच्या नियम व आदेशाने करण्यात येत असल्याचे येथील गटशिक्षणाधिकारी मिंलिद तुरुकमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शासनाच्या आदेशाप्रमाणे नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन शाळाबाह्य मुलांची नोंदणी करीत असल्याचे जि. प. शाळा डोईफोडवाडीचे शिक्षक विलास दुधाळ यांनी सांगितले.