लाल परावर्तिका बसविण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:39+5:302021-01-13T05:27:39+5:30

साहित्यामुळे अडथळा अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध बांधकामाचे साहित्य पडलेले असते. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. ...

Red Reflector Installation Campaign | लाल परावर्तिका बसविण्याची मोहीम

लाल परावर्तिका बसविण्याची मोहीम

साहित्यामुळे अडथळा

अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध बांधकामाचे साहित्य पडलेले असते. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. परिणामी लहान-मोठ्या अपघातांमध्येही वाढ झाली आहे. हे साहित्य योग्यप्रकारे ठेवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

अवैध धंदे वाढले

बर्दापूर : गावापासून जवळच असलेल्या बर्दापूर फाट्यावर बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु झाले आहेत. हॉटेल, पान टपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळला जातो. तसेच अवैधरित्या दारुची विक्रीही होते. पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण ग्राहक वैतागले

माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागात काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविषयी तक्रारी करुनही संबंधितांनी दखल घेतलेली नाही. बीएसएनएलची लाईन बिघडल्याने इतर कंपन्यांच्या टॉवरची रेंज मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्राहक महत्त्वपूर्ण कामे खोळंबल्याने वैतागले आहेत.

कर्णकर्कश हॉर्नचा त्रास

गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेकवेळा वाहनचालक नागरिकांच्या जवळ येऊन मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक या मोठ्या आवाजाने दचकत आहेत. या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गतिरोधक बसवा

माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालवली जात असून, अपघातही होत आहेत.

अभिवादनास हजर राहण्याचे आवाहन

बीड : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १२ जानेवारी रोजी शहरातील राजीव गांधी चौक येथील पुतळ्याला सकाळी ८ वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. सुशिला मोराळे, पुष्पा गोविंद ढाकणे, माया परदेशी, शुभांगी परदेशी, सोनके, कुलकर्णी, सुरेखा बडे, सुमन आंधळे, संगीता दराडे, मीरा सानप, प्रेमा आघाव, सुनीता मस्के, दिशा ढाकणे, मंगल गीते यांनी केले आहे.

Web Title: Red Reflector Installation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.