रापमच्या शिकाऊ उमेदवारांसाठी भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST2021-01-20T04:33:59+5:302021-01-20T04:33:59+5:30
ट्रकच्या धडकेने दोन युवक ठार बीड : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील महेश सुनील राऊत (३४) व बालासाहेब आनंदराव झगडे ...

रापमच्या शिकाऊ उमेदवारांसाठी भरती
ट्रकच्या धडकेने दोन युवक ठार
बीड : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील महेश सुनील राऊत (३४) व बालासाहेब आनंदराव झगडे (३४) हे दोन युवक ठार झाले. हा अपघात १८ जानेवारीला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर पांगरबावडी शिवारात बीड बायपास रस्त्यावर झाला. राजेंद्र अनिल राऊत यांच्या फिर्यादीवरून ट्रक(एमएच १८ एए ७१६२)च्या चालकाविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद असून, ट्रक ताब्यात घेतल्याचे सपोनि उबाळे म्हणाले.
ज्वारीवरून मुलाची वडिलांना मारहाण
बीड : ज्वारी का विकू देत नाही, या कारणावरून मुलगा अभिमान घाडगे याने वडील बुवाजी यांना शिवीगाळ करून लाकडाने मारहाण केली. आईला जिवे मारण्याची धमकी दिली. अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
माहिती सादर करावी
बीड : निवृत्ती वेतनधारकांनी त्यांना आयकर लागू होत असेल तर आयकरबाबतचा तपशील २२ जानेवारीपर्यंत बीडच्या कोषागार कार्यालयाकडे सादर केला तरच जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ चे मासिक निवृत्ती वेतन नियमित चालू राहील, असे आवाहन कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.