भारतीय नौदलात भरती; उपाडे, चांगिरेंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:08+5:302020-12-29T04:32:08+5:30
अंबाजोगाई : भारतीय नौदलात भरती झालेले अक्षय उपाडे व ऋतुराज चांगिरे यांचा योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...

भारतीय नौदलात भरती; उपाडे, चांगिरेंचा सत्कार
अंबाजोगाई : भारतीय नौदलात भरती झालेले अक्षय उपाडे व ऋतुराज चांगिरे यांचा योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव गणपत व्यास, कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, शैलेश वैद्य, मेजर एस. पी. कुलकर्णी, लेफ्टनंट डॉ. राजकुमार थोरात यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. हे दोन्ही योगेश्वरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. संरक्षण दलात भरती होण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. भारतीय नौदलात भरती होण्याचे प्रमाण कमी आहे. पण, यावर्षी दोन विद्यार्थी नौदलात भरती झाले. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थेचे सचिव व्यास म्हणाले, सेवा व समर्पित जीवन जगणे हे उद्दिष्ट ठेवून आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होत आहेत, याचा आनंद आहे.
उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर म्हणाले, आमच्या महाविद्यालयात व संस्थेच्या वतीने संरक्षण दलात भरती होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. डॉ. शैलेश वैद्य म्हणाले, युवकांनी करियर म्हणून सैन्याची निवड करावी व जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत. सूत्रसंचालन मेजर एस .पी. कुलकर्णी यांनी केले. लेफ्टनंट डॉक्टर थोरात यांनी आभार मानले.