आयकरदात्या शेतकऱ्यांकडून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST2021-01-03T04:33:45+5:302021-01-03T04:33:45+5:30
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्राचे बॉक्स उघडे आहेत. ...

आयकरदात्या शेतकऱ्यांकडून वसुली
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्राचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठडयांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्यूज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी रोहित्रांना संरक्षण कठडे अथवा भिंत बांधावी व कवाडे बसवावीत. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रब्बी पिके जोमात
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील विहिरी, इंधन विहिरी, पाझर तलाव व विविध जलस्त्रोत तुडूंब भरले. परिणामी रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात बहरला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, करडई ही पिकेही चांगली आली असून परिसरात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिके जोमात असल्याने शेतकºयाच्या चेहऱ्यावरही समाधान दिसू लागले आहे.