आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:54+5:302021-02-25T04:41:54+5:30
वडवणी :वडवणी तालुक्यातील एकुण २२ हजार १२० शेतकरी हे पंतप्रधान किसान सन्मान योजना योजनेसाठी पाञ ठरली असून आजपर्यंत या ...

आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुली
वडवणी :वडवणी तालुक्यातील एकुण २२ हजार १२० शेतकरी हे पंतप्रधान किसान सन्मान योजना योजनेसाठी पाञ ठरली असून आजपर्यंत या योजनेत तालुक्यातील २२ हजार १२० शेतकरी ऑनलाईन झाले आहेत. पहिला हप्ता २००० रूपये प्रमाणे ४ कोटी ४२ लाख ४० हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ७२० शेतकरी ऑनलाईन प्रक्रियामध्ये अडकल्यामुळे वंचित राहिलेले आहेत.
प्रधानमंञी किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमीन असणा-या शेतकरी यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास सुरूवात झाली. शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता दोन हजार म्हणजे वार्षिक सहा हजार अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेत केंद्र सरकारने निकष शिथील केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबाला दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पाञ ठरली आहेत.
याबाबत तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनामध्ये सहभागी पाञ शेतकरी यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असून ज्या शेतकऱ्यांची आधार ऑनलाईन झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र या ठिकाणी जावून खात्याशी आधार संलग्न करून ऑनलाईन करावेत. यामुळे पुढील हप्ता खात्यावर जमा होण्यासाठी अडचण येणार नाही.
आयकर भरणा करणा-या शेतकरी यांच्याकडून दिली गेलेली लाभाची वसूली करण्यात येत असून आजपर्यंत तालुक्यातील१७२ लाभार्थी यांच्या कडून सुमारे १७ लाख ३४ हजार रूपये वसुली केली आहे, अशी माहिती अव्वल कारकून मंगेश बुचुडे यांनी सांगितले.