जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी राऊत, सचिवपदी कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:34 IST2021-02-16T04:34:38+5:302021-02-16T04:34:38+5:30

बीड : जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सदानंद राऊत तर, सचिवपदी ॲड. नरेंद्र कुलकर्णी यांची निवड झाली. वकील संघाच्या ...

Raut as President of District Advocates Association, Kulkarni as Secretary | जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी राऊत, सचिवपदी कुलकर्णी

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी राऊत, सचिवपदी कुलकर्णी

बीड : जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सदानंद राऊत तर, सचिवपदी ॲड. नरेंद्र कुलकर्णी यांची निवड झाली. वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बालाप्रसाद करवा यांनी निकाल जाहीर केला.

जिल्हा वकील संघाच्या नव्या कार्यकारिणीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कोविडमुळे ही निवडणूक लांबली होती. या निवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात होते. तर, एक जागा बिनविरोध निवडली गेली होती. सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. ७५९ पैकी ६७५ मतदारांनी मतदान केले. यामध्ये अध्यक्षपदासाठी सदानंद राऊत यांना ४९७ मते मिळाली तर, अनिल सुतार यांना १६७ मते मिळाली. देविदास पायाळ यांना अवघी ६ मते मिळाली ३३० मतांनी सदानंद राऊत विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी संजय मिसाळ यांना ५३२, अंकुश तांबे यांना १३१ मते मिळाली ४०१ मतांनी मिसाळ विजयी झाले सचिव पदासाठी नरेंद्र कुलकर्णी यांना ४१० मते मिळाली तर एकनाथ काकडे यांना २५७ मते मिळाली १५३ मतांनी कुलकर्णी विजयी झाले. सहसचिव पदासाठी सय्यद जाेहेबअली अझहरअली यांना ३९७ मते मिळाली तर, सुरेश कांबळे यांना २२० मते मिळाली. सय्यद जोहेबअली १७७ मतांनी विजयी झाले. कोषाध्यक्षपदासाठी गणेश तावरे यांना ४४१ तर, सैरंद्रा डोईफोडे यांना २२० मते मिळाली २२१ मतांनी गणेश तावरे विजयी झाले. महिला प्रतिनिधी पदासाठी विशाखा जाधव यांना ४७६ तर, गितप्रभा बेहरे यांना १८६ मते मिळाली २९३ मतांनी जाधव विजयी झाल्या.

-----------

११३ मते झाली बाद

वकील संघाच्या निवडणूक उच्चशिक्षीत लोकांची समजली जाते मात्र, योग्य पध्दतीने मतदानही करता न आल्याने या निवडणूकीत तब्बल११३ मते बाद झाली. अध्यक्षपदासाठी ५, उपाध्यक्षपदासाठी १२, सचिवपदासाठी ८, सहसचिवपदासाठी ५८, कोषाध्यक्षपदासाठी १४ तर महिला प्रतिनिधी पदासाठी १६ अशी एकूण ११३ मते बाद झाली.

---

Web Title: Raut as President of District Advocates Association, Kulkarni as Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.