बंद कोविड केअर सेंटरमध्ये उंदरांचे राज्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:20+5:302021-08-12T04:37:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने कोविड केअर सेंटर वाढविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात ...

बंद कोविड केअर सेंटरमध्ये उंदरांचे राज्य !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने कोविड केअर सेंटर वाढविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने काही कोविड सेंटर बंद करण्यात आलेले आहेत. परंतु यातील लाखो रुपयांचे साहित्य धूळ खात पडले आहे. अनेक सीसीसीमध्ये उंदरांचे राज्य असल्याचे दिसत आहे. गाद्या, कॉट अस्ताव्यस्त पडले आहेत. गाड्या पडून असल्याने खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. याचे योग्य नियोजन केल्यास लाखो रुपयांचे साहित्य दुर्दैवाने तिसरी लाट आल्यास उपयोगास येऊ शकते.
...
बंद सेंटरना वाली कोण?
n जिल्ह्यात बंद केलेल्या कोविड सेंटरला सध्या कोणीच वाली नसल्याचे दिसत आहे.
n जसे बंद झाले, तेव्हापासून याकडे नगरपालिका, आरोग्य विभाग अथवा दुसरी कुठलीच यंत्रणा फिरकली नसल्याचे दिसते.
बंद केल्यापासून सीसीसीकडे कोणीच फिरकेना
n एप्रिल, मे, जून महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे शासकीय तसेच लोकसहभागातून कोरोना सेंटर सुरू केले. लाखोंचे साहित्य खरेदी केली. परंतु ज्या दिवसापासून या सीसीसी बंद झाल्या आहेत, तेव्हापासून या कुलूपबंद आहेत. शिवाय इकडे कोणीच फिरकलेले नसल्याने येथील साहित्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसते.
100821\10_2_bed_6_10082021_14.jpeg
बीड शहरातील बार्शी रोडवर असणाऱ्या लॉ कॉलेजच्या कोवीड केअर सेंटरमध्ये अशाप्रकार साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे.