केज : गेल्या दीड महिन्यांपासून सक्तीने वीजवसुली करणाऱ्या महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांनी आता दंड थोपटले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली बीड-लातूर महामार्गावर केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोविडचे सर्व नियम व सूचनांचे पालन करून निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण व सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी सक्तीने चालू असलेली वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी, गेल्या महिन्याभरापासून खंडित केलेल्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तत्काळ जोडून द्यावेत, लॉकडाऊन काळातील वीज बिल सरसकट माफ करावे, अशा मागण्या केल्या. योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला. या आंदोलनाला एकल महिला संघटनेच्या मीरा नाईकवाडे, गौरी शिंदे, लता सावंत, तारा घोडके, उर्मिला गालफाडे, यांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, तालुकाध्यक्ष विश्वास जाधव, शहराध्यक्ष फिरोजखान पठाण, सुग्रीव करपे, चंद्रकांत अंबाड, गजानन भाकरे, विकास करपे, दत्ता करपे आदी निवडक पदाधिकारी सहभागी होते.
===Photopath===
190321\deepak naikwade_img-20210319-wa0015_14.jpg