शिरूर कासारमध्ये रानभाजी महोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:51+5:302021-08-18T04:39:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : शेतशिवारात अगदी मोफत व हमखास औषधी, गुणकारी रानभाज्या मोफत मिळत असल्याने त्यांची किंमत ...

शिरूर कासारमध्ये रानभाजी महोत्सव साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : शेतशिवारात अगदी मोफत व हमखास औषधी, गुणकारी रानभाज्या मोफत मिळत असल्याने त्यांची किंमत कळत नाही. वास्तविक या रानभाज्यांबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात. यासाठी या भाज्यांची ओळख व फायदे समजावून सांगण्यासाठी मंगळवारी शिरूर तालुका कृषी कार्यालयात हा रानभाज्यांचा खजिना खुला करण्यात आला होता .
रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती उषाताई सरवदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील, पंचायत समिती सदस्य बबनराव चौधरी, कल्याण तांबे, शेतकरी विष्णू बेदरे, निवृत्ती बेदरे आदींची उपस्थिती होती. तालुका कृषी कार्यालयाचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे, मंडळ कृषी अधिकारी दिलीप तिडके, कविता ढाकणे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
170821\img-20210810-wa0015.jpg
फोटो