मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी बीडमध्ये रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:32+5:302021-06-04T04:25:32+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आ. विनायक मेटे हे संघर्ष करीत असून, मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रातील अन्य ...

मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी बीडमध्ये रॅली
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आ. विनायक मेटे हे संघर्ष करीत असून, मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रातील अन्य बहुजन समाजबांधवांची जनभावना आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरुद्ध निर्णय आल्यानंतर मराठा समाजात असंतोष निर्माण झाला. असे शिवसंग्राम युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्याने आज पुन्हा रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ मराठा समाजावर आली आहे. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनला बीडमध्ये मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा काढण्यात येत आहे. हा केवळ मोर्चा नसून, आरक्षणाच्या लढ्यासाठी मोर्चा आहे. बीड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यासाठी ही मोटारसायकल रॅली काढली असल्याचे शिवसंग्राम युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी सांगितले.
शिवसंग्राम भवन येथून सुरू झालेली ही रॅली शाहूनगर, अण्णा भाऊ साठे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून मार्गस्थ होत महापुरुषांच्या स्मारकास हार अर्पण करून शिवसंग्राम भवन येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाने समारोप करण्यात आला. यावेळी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, नितीन आगवान, गणेश धोंढरे, शेषेराव तांबे, मनोज जाधव, राहुल गायकवाड, शेख शकील, कुतुब भाई, आबेद शेख, प्रकाश जाधव, परशुराम जाधव, हरीश शिंदे, अनिकेत देशपांडे, अक्षय माने, सौरभ तांबे, प्रेम धायजे, अर्जुन यादव यांच्यासह अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व युवक उपस्थित होते.
===Photopath===
030621\03bed_1_03062021_14.jpg
===Caption===
मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीने ३ जून रोजी बीड शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.