शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:20 IST

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे.

ठळक मुद्दे३४ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला; आगामी विधानसभा निवडणूक बहीण - भावासाठी आव्हानात्मक

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे. त्यामुळे परळी शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याचे दिसून आले. ३४ वर्षाांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला ग्रामीण भाग हा या निवडणुकीतही अभेद्य राहिला.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात चांगलीच बाजू भक्कम केली आहे. बीड लोकसभा २०१४ च्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यपेक्षाही महायुतीला या निवडणुकीत कमी मताधिक्य आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य कायम राहील हे आजच सांगता येणार नाही. तथापि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघात मतदारांशी अधिक संपर्क आहे. सर्वसामान्यांच्या बाजूने ते उभे राहतात, कार्यकर्त्यांची तगडी टीम आहे. परळी नगर परिषद, पंचायत समिती, बाजार समिती ताब्यात आहेत. स्वत: धनंजय मुंडे यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे येणाºया निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा सामना भाजपला करावा लागणार आहे.दुसरीकडे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू करत लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातही आगामी निवडणुकीत बाजी मारण्याचा त्यांना मोठा विश्वास आहे. शहर व ग्रामीण भागात विकासाची कामे आणणे सुरू केले आहे. विधानसभेला या मतदार संघात ताई व भाऊ यांच्यापैकी कामाचा कोण हेच पाहिले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बहिण भावामध्ये लढत होणार आहे. दोघांनाही येणाºया निवडणुकीत आव्हाने राहणार आहेत. कारण वंचित आघाडी ही प्रत्येक गावात पोहचली आहे.मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षाराज्य व केंद्रात भाजपाची सत्ता असूनही परळी मतदारसंघात गत ५ वर्षात नवीन एकही प्रकल्प उभारला गेला नाही.त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या सत्तेचा उपयोग झाला नाही, कामगारांच्या हाताला काम मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण होत नाही, हे महत्त्वाचे प्रश्न कायमच आहेत.शहर व ग्रामीण भागात रस्त्याचे काम जोरात सुरू आहे, अपवाद राहिला परळी-पिंपळा धायगुडा रस्ता.या रस्त्याचे काम हे सुनील हायटेक एजन्सीमुळे अर्धवट राहिले आहे. त्यामुळे जनतेतून मतांमध्ये काही अंशी रोष प्रकटला. रस्ता लवकर होईल या आशेने काहींनी भाजपला पसंती दर्शवली.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे