शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

राज ठाकरे नवीन वर्षात मराठवाड्यात; ३ जानेवारीला परळीत राहणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:33 IST

दौऱ्यानिमित्त मराठवाडय़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची परळी झाली महत्त्वपूर्ण बैठक

परळी (बीड) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 जानेवारी रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त येथे शुक्रवारी मराठवाडय़ातील मनसे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. 

मनसेचे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी सांगितले की, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नववर्षात परळी दौरा होणार आहे. त्यांचे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, गोपीनाथ गड  येथे हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर मोटारीने ते परळी कोर्टात उपस्थित राहतील. 

कोर्टात काय आहे प्रकरण ?2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबई येथे अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले. परळी - धर्मापुरी पॉईंटवर कार्यकर्त्यांकडून दगडफेकीत बसचे नुकसान झाले होते. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यावर व चिथावणीखोर विधानाबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी परळी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासाठी राज ठाकरे परळी कोर्टात ३ जानेवारी रोजी हजर राहणार आहेत. 

मनसेकडून सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारमनसे नेते दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, राज्य उपाध्यक्षा वर्षा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या प्रसंगी मराठवाडय़ातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, शेख राज, रूपेश देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्क्ष बालाजी मुंडे, जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुकाउपाध्यक्ष विठ्ठलराव झिल्मेवाड, ऋषिकेश बारगजे, हनुमान सातपुते, प्रशांत कामाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBeedबीड