दिलेला शब्द पाळत मदतीतून दिली उभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:45+5:302021-06-28T04:22:45+5:30
मेमध्ये अवकाळी पावसामध्ये नांदुरघाट शिवारामध्ये शेतात काम करताना गीताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. ...

दिलेला शब्द पाळत मदतीतून दिली उभारी
मेमध्ये अवकाळी पावसामध्ये नांदुरघाट शिवारामध्ये शेतात काम करताना गीताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांचे पती जगन्नाथ ठोंबरे यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे मातृपितृछत्र हरवलेली अश्विनी पोरकी झाली. या घटनेनंतर केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरविंद थोरात यांनी अश्विनीला जीवनावश्यक लागणाऱ्या जवळपास १३ हजार रुपयांच्या वस्तू, साहित्याची मदत केली. त्यावेळी शिक्षणाचा जेवढा खर्च होईल, तेवढा उचलण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, शनिवारी अरविंद थोरात यांनी अश्विनीला दहावीसाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य देत शिकण्यासाठी बळ दिले. यावेळी थोरात यांच्यासोबत मेजर गणेश लामतुरे, गोविंद तानगे, अमोल जाधव, स्थानिक पिठ्ठीघाट येथील रहिवासी उपस्थित होते.
===Photopath===
270621\27bed_1_27062021_14.jpg