सावरगाव परिसरात पावसाची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:23+5:302021-06-25T04:24:23+5:30

सौताडा-जामखेड रस्त्याची दुरवस्था पाटोदा : बीड-जामखेडदरम्यान असलेल्या सौताडा ते जामखेडदरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे ...

Rainy season in Savargaon area | सावरगाव परिसरात पावसाची ओढ

सावरगाव परिसरात पावसाची ओढ

सौताडा-जामखेड रस्त्याची दुरवस्था

पाटोदा : बीड-जामखेडदरम्यान असलेल्या सौताडा ते जामखेडदरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

....

ग्रामीण भागातील एस.टी.बस सुरू करण्याची मागणी

आष्टी : आष्टी आगाराने अनेक लांबपल्ल्याच्या एस.टी.बस सुरू केल्या आहेत. मुंबई, पुणे, कल्याण, नाशिक, औरंगाबाद येथे बस सुरु केल्या आहेत. परंतु एस.टी.ने अजूनही ग्रामीण भागातील बस सुरू केल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी ग्रामीण भागात एस.टी. बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

....

कढाणी तलावाचे गेट उघडावे

धानोरा : आष्टी तालुक्यातील उंदरखेल येेथे मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पात यंदाही पाणी साठा उपलब्ध आहे. परंतु या तलावाचे गेट काही शेतक-यांनी बुजविले आहे. त्यामुळे तलावातून कांबळी नदीपत्रातून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे तलावाखालील गावात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तरी पाटबंधारेने तलावाचे गेट उघडावे, अशी मागणी नदीकाठच्या गावातील नागरिकांतून होत आहे.

Web Title: Rainy season in Savargaon area