सीना धरणक्षेत्राला पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:05+5:302021-07-09T04:22:05+5:30

कडा : आष्टी व कर्जत (जि.नगर) हद्दीवर असलेल्या सीना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने या धरणातही अवघा १३.५९ ...

Rainfall to the Cena Dam area | सीना धरणक्षेत्राला पावसाची हुलकावणी

सीना धरणक्षेत्राला पावसाची हुलकावणी

कडा : आष्टी व कर्जत (जि.नगर) हद्दीवर असलेल्या सीना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने या धरणातही अवघा १३.५९ टक्के पाणीसाठा राहिला आहे.

तालुक्यातील सर्व पाणीसाठे संपल्यावर हे सीना धरणच आष्टी तालुक्याचा आधार ठरते. सीना धरणावर कर्जत तालुक्यातील ७ हजार ६६२, तर आष्टी तालुक्यातील ७७३ हेक्टर क्षेत्र उजव्या व डाव्या कालव्याद्वारे ओलिताखाली येते. मागील वर्षी जोरदार पावसामुळे तसेच कुकडीतून आवक झाल्याने जुलैमध्ये धरण निम्मे भरले होते. तसेच नंतरही चांगला पाऊस झाल्याने निर्मितीनंतर प्रथमच सीना धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यातून रबीचे एक व उन्हाळी दोन आवर्तने मिळाल्याने तालुक्यातील लाभक्षेत्राला चांगला दिलासा मिळाला होता. शिवाय सीना-मेहकरी उपसासिंचन योजनेतून तालुक्यातील मेहेकरी धरणात ओव्हरफ्लोचे पाणी येऊन तालुक्याला लाभ झाला होता; परंतु यंदा सीना पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे.

...

लघु प्रकल्पातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

वेलतुरी ७२९.५०, केळ ७४२.०५ पाणी साठा आहे. हे दोन तलाव वगळता तालुक्यातील पांढरी (लघु तलाव), ब्रह्मगाव, किन्ही, चोभानिमगाव वडगाव, बेलगाव, लोणी, पिंपळा, मातकुळी, सिंदेवाडी, खुंटेफळ, कोयाळ, सुलेमान देवळा, धामणगाव व पांढरी (साठवण तलाव) हे पंधरा तलाव जोत्याखाली आहेत. तर पारगाव जोगेश्वरी (क्रमांक एक), पारगाव जोगेश्वरी (क्रमांक दोन), बळेवाडी, पिंपरी घुमरी, जळगाव हे पाच तलाव कोरडेठाक आहेत.

.....

Web Title: Rainfall to the Cena Dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.