शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:10+5:302021-04-05T04:30:10+5:30
शिरूर कासार : येथील थोरात वस्तीजवळ असलेल्या बाळासाहेब घोरपडे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ...

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड
शिरूर कासार : येथील थोरात वस्तीजवळ असलेल्या बाळासाहेब घोरपडे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलीस अधीक्षकांच्या पथकाने अकराजणांना अटक केली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास केलेल्या या कारवाईत रोख रकमेसह ४ लाख ५५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
येथील थोरात वस्तीजवळ असलेल्या बाळासाहेब घोरपडे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेवर विनापरवाना बेकायदेशीररीत्या पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षकांच्या पथकातील ए.पी.आय. विलास हजारे, बापू राऊत, सादिक पठाण, बालाजी बास्केवाड, संभाजी भिल्लारे यांनी धाड टाकली. यावेळी तब्बल अकरा लोकांना अटक करीत त्यांच्याकडून रोख रकमेसह मोटारसायकल, मोबाईलसह ४ लाख ५५ हजार ९२० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. जुगारात सहभागी असलेल्या बाळासाहेब घोरपडे, अन्वर शेख, भाऊसाहेब सुळे, दत्ता तांबे, राजेंद्र डोके, अशोक बांगर, विष्णू पवार, साईनाथ कदम, दीपक खोले, राजेंद्र अंदूरे व गोरख वीर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार भागवत सानप करत आहेत.