शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत पत्त्याच्या क्लबवर छापा; २७ जुगारी ताब्यात, साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 15:33 IST

Raid on gambling club in Ambajogai पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत दाखल झाले होते.

ठळक मुद्देअंबाजोगाई साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात पथकाची कारवाई काही व्यक्ती झन्ना-मन्ना (फेक पत्ता) नावाचा जुगार खेळणारे अटकेत

अंबाजोगाई : गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक आ. राजा यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.२०) अंबाजोगाई येथे दाखल होत कारखाना रोडवरील एका पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी झन्ना-मन्ना जुगार खेळणाऱ्या २७ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मोठ्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

बुधवारी पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत दाखल झाले होते. यावेळी अंबाजोगाई साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात काही व्यक्ती झन्ना-मन्ना (फेक पत्ता) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरिक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी रात्री ९.३० वाजता पथकातील कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी तीन गटात २७ व्यक्ती जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७ लाख ५७ हजार दोनशे रुपयांच्या रोख रकमेसह ११ दुचाकी, १ चारचाकी, मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विलास हजारे, पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलमवाड, तौर यांनी पार पाडली. एवढ्या मोठ्या संख्येने जुगारी पकडले गेल्याने शहरात खळबळ उडाली असून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

यांच्यावर झाली कारवाई :याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून सतीश धोंडीराम चामनर, दत्ता गोविंद साखरे, विशाल पंडितराव चाटे, सय्यद सुलतान सय्यद दस्तगीर, सचिन बालासाहेब गुळभिले, वाहीद बेग खालील बेग, आनंद जगन्नाथ कदम, पुरुषोत्तम संजय कदम, अक्षय विश्वंभर काळे, अमोल दिलीपराव लोमटे, नितीन उर्फ तुळशीराम पांडुरंग यादव, ज्ञानेश्वर उर्फ माऊली पतंगे, नितीन कैलास साठे, राहुल भगवानराव रेणापुरे, सय्यद इलाही पाशा, देविदास काशिनाथ चौगुले, गोविंद राजाभाऊ शेप, एजाज शेख फरहाद, अनिल मुकुंदराव पिसाळ, भैरवनाथ सिद्धराम घोगरे, प्रमोद सिद्धरामअप्पा पोखरकर (सर्व रा. अंबाजोगाई), भगवान विठोबा वैद्य, नितेश मधुकर वैद्य, अहमद इब्राहीम बागवान (रा. घाटनांदूर),  नासेरखान शेरखान, निलेश अशोक फड (रा. परळी) आणि राम बली निसार (रा. अलाहबाद, उत्तर प्रदेश) या २७ जुगाऱ्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmbajogaiअंबाजोगाईBeedबीड