शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळेत राडा; खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिका भिडल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 20:01 IST

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

धारूर : तालुक्यातील जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजवण्याचं काम करणारी महिला आणि त्याच शाळेतील एका शिक्षिकेमध्ये वाद झाला. यातून दोघींनी शाळेच्या प्रांगणात अक्षरशः एकमेकींचे केस ओढत मारहाण केली. ही घटना आज शाळेच्या आवारातच घडली असून या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेबरोबर झटापट केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत. 

तालुक्यातील जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी शिवणाऱ्या महिलेकडून दर्जदार आहार न देणे, अल्प प्रमाणात खिचडी, बिस्किट देण्याचे प्रकार सातत्याने होतात. यामुळे शाळेतील एका शिक्षिकेने या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पोषण आहार देण्यास सांगितले. 

दरम्यान, त्यानंतर खिचडी शिजवणारी महिला त्या शिक्षिके बाबत उलटसुलट चर्चा करत चुकीचे वक्तव्य करत होती. यातच खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेच्या आवारात लघुशंका करत असल्याबाबत ही महिलेने पतीला समज द्यावी असं सांगण्यात आल होत. परंतु सगळा गाव ईथे येऊन तेच करतो ? मग माझ्या पतीमुळे तुला काय त्रास आहे, अस म्हणत शिक्षिकेवरच महिलेने आकस दाखवला होता. 

महिला आणि शिक्षिका भिडल्या दरम्यान, आज खिचडी शिजविणाऱ्या महिलेने या शिक्षिकेसोबत हुज्जत घातली. यावेळी शिक्षकेने ही त्या महिलेस तू विद्यार्थ्यांना पुरेसा आहार देत जा असे सांगितले. विद्यार्थ्यांना पुरेसं अन्न देण्याची पुन्हा मागणी केल्याने महिलेने पतीसह शाळे येत शिक्षिकेसोबत वाद घालत मारहाण केली. यावेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेमध्ये होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

मुख्याध्यापिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या प्रकारास मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे सांगितलं जात आहे. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पुरेस अन्न विद्यार्थ्यांना देणे आणि यावर नियंत्रण ठेवणे हे मुख्याध्यापिकेचे काम आहे. मुख्याध्यापिका सुद्धा खिचडीमध्ये हात ओले करून घेत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे. 

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षणTeacherशिक्षक