मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:53+5:302021-06-28T04:22:53+5:30
वाहनधारक त्रस्त अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, ...

मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न
वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव अशा अनेक रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
पाण्याचा अपव्यय
अंबाजोगाई : शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासली नाही. मात्र नागरिकांना याची किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
विषाणुजन्य आजार
अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणुजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे लहान बालके, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे.
प्लास्टिक बंदीला खो
बीड : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणाला घातक ठरणारा आहे. यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच
बीड : प्लास्टिक वापरासाठी बंदी असतानाही अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांमध्ये विविध वस्तू दिल्या जातात. भाजी मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.