शिरूरमध्ये ‘मास्क लावा, अंतर ठेवा’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:20+5:302021-03-13T04:59:20+5:30
शिरूर कासार : गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या महाशिवरात्रीचे स्वरूप कोरोना महामारीने बदलून टाकले. तर ४२ ...

शिरूरमध्ये ‘मास्क लावा, अंतर ठेवा’चा गजर
शिरूर कासार : गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या महाशिवरात्रीचे स्वरूप कोरोना महामारीने बदलून टाकले. तर ४२ वर्षे सुरू असलेल्या भव्य दिव्य सोहळ्याला यावर्षीसुद्धा मर्यादित ठेवावे लागले. महाशिवरात्र पर्वणीवर हरहर महादेव या गर्जनेने शिवदरबार दुमदुमत असे. मात्र, यावर्षी हर हर महादेव ऐवजी ‘मास्क लावा, गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवून रहा, भावनेला आवर घाला व सुरक्षेचे भान ठेवा’ अशा सूचनांचा जागर परिसरातील भाविकांच्या कानी पडत होता. प्रशासन व संस्थानने केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र धाकट्या अलंकापुरीत महाशिवरात्र पर्वणीला पहायला मिळाले.
सिध्देश्वर संस्थान हे धाकटी अलंकापुरी म्हणून सर्वदूर प्रसिद्धीस आले आहे. सतत गर्दी असलेला महाशिवरात्र सोहळा यंदा मात्र मोजक्याच उपस्थितीत पार पाडावा लागला.
महंत पदाची तपपूर्ती
संत आबादेव महाराज यांच्या गादीवर स्वामी विवेकानंद शास्त्री यांना बसून बरोबर बारा वर्षे झाली. त्यांचा व तपपूर्ती सोहळा ऐश्वर्यसंपन्न करण्याचे आयोजन शिरूरसह पंचक्रोशीतील भाविकांचे होते. मात्र, या आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून तपपूर्ती सोहळा अगदी साध्या पद्धतीने करावा लागला. यावर्षी कोरोनामुळे सर्वांची मोठी निराशा झाली. याची खंत व्यक्त करत असतांना सिध्देश्वराच्या कृपेने पुढील ४४ वा सोहळा मोठा भव्य दिव्य करू. त्यासाठी संस्थानला सतत सहकार्य चालू ठेवावे असे आवाहन स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले आहे.
===Photopath===
110321\img20210311133440_14.jpg