शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
2
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
3
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
4
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
5
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
6
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
7
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
8
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
9
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
10
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
12
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
13
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
14
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
15
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
16
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
17
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
18
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
19
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
20
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात केंद्रांवर तूर खरेदी पुन्हा बंद: दोन वेळा मुदतवाढ तरीही ११ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:31 IST

तूर खरेदीला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी शेतक-यांतून जोर धरत आहे. या मागणीचा विचार करुन तातडीने निर्णय अपेक्षित आहे.

ठळक मुद्देहमी भावाचा तोरा, तुरीला नाही थारा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हमीदराने तूर खरेदीचा ढोल बडवणाऱ्या शासनाचे दुर्लक्ष आणि नाफेडच्या दुर्लक्षतेमुळे तूर खरेदीत वारंवार अडथळे येत आहेत. १८ एप्रिलनंतर पाच दिवसांचा खंड देवून पुन्हा १५ मे पर्यंत तूर खरेदीचे आदेश देण्यात आले. परंतु वास्तविक परिस्थिती काय आहे, याचे भान न ठेवता केवळ आदेश बजावण्याचे काम झाल्याने दिलेल्या मुदतीत नोंदणी केलेल्या शेतक-यांची तूर खरेदी झालेली नाही. त्यामुळे तूर खरेदीला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी शेतक-यांतून जोर धरत आहे. या मागणीचा विचार करुन तातडीने निर्णय अपेक्षित आहे.

१ फेब्रुवारीपासून हमीदराने तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात केंद्र सुरु केले होते. १४ केंद्रांवर १३४ दिवसांत २ लाख १४ हजार ३८८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तरीही नोंदणी केलेल्या व तूर न विकलेल्या शेतकºयांची अद्यापही मोठी संख्या आहे. तूर खरेदीपासून नियोजनाचा अभाव असल्याने गोदाम उपलब्ध झाले नाही. त्यामुळे खरेदी केलेली तूर साठविण्याचा प्रश्न वारंवार निर्माण झाला. वखार महामंडळाकडूनही गोदाम उपलब्ध झाले नाही. मागील वर्षीची तूर गोदामातून बाहेर काढण्यात शासन यंत्रणेला अपयश आले. त्यामुळे गोदामांचा प्रश्न कायम राहिला.

एकीकडे गोदामाचा प्रश्न असताना दुसरीकडे खरेदी केलेली तूर भरण्यासाठी नाफेडकडून बारदाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे अनेकवेळा काही कालावधीसाठी तूर खरेदी बंद ठेवण्याची वेळ केंद्र चालकांवर आली. परिणामी शेतकºयांना ताटकळावे लागले.

गोदाम उपलब्ध करुन द्यावे तसेच बारदाणा पुरवठा सुरळीत करावा यासाठी शासन व नाफेडकडे पाठपुरावा करण्यात एक- दोन लोकप्रतिनिधी वगळता इतरांनी दुर्लक्षच केल्याचे दिसते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य आधारेखित झाले नाही. आता १५ मेच्या रात्री बारा वाजेनंतर तूर खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे वंचित शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोंदणी केलेल्या जवळपास ११ हजार शेतकºयांची तूर खरेदी होणार की नाही याबद्दल यंत्रणेतील कोणीही बोलायला तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त दिसू लागला आहे.एक लाख क्विंटल तूर पडूनखरेदी झालेली तूर नाफेडच्या बारदाण्यातून रितसर गोदामात पोहोच झाली तरच या तुरीचे शेतकºयांना पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवर पडून असलेली तूर साठविण्यासाठी गोदामांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्या वातावरणात बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१८ एप्रिलपर्यंतची नोंदणीबीड जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत ३२ हजार ५१९ शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली.तसेच मुदत संपल्याने अनेकांना नोंदणी करता आली नाही.

२ लाख क्विंटल खरेदी१४ मेपर्यंत जिल्ह्यातील २१ हजार २२७ शेतकºयांची २ लाख १४ हजार ३८८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी पुणतांबा, पैठण, फलटण, कुडूवाडी, बारामती, बीड, गेवराईच्या गोदामात १ लाख १ हजार ५९० क्वि. तूर पाठविण्यात आली.

यंत्रणेतुनही मुदतवाढीची मागणी१५ मेपर्यंतच्या एकूण परिस्थितीवरुन नोंदणीपासून वंचित राहिलेले ७ हजार तर नोंदणी झालेले १२ हजार शेतक-यांची तूर खरेदीसाठी व आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी याबाबत जिल्हाधिकारी, नाफेड आणि मार्केटिंग फेडरेशनला कळविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना निर्णयाची प्रतीक्षा आहे.

बारदाणा संपलातूर खरेदी केंद्रांना पुरेसा बारदाणा पुरवठा झाला नाही. दोन दिवसांपासून बारदाणा नसल्याने सातपेक्षा जास्त केंद्रांवर तूर खरेदी बंद पडली. तर खरेदी केलेली १ लाख १२ हजार ७९० क्विंटल तूर केंद्रांवर पडून आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी