शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बीडमध्ये सरपंचाची हत्या होण्यापूर्वी ही कसली मीटिंग?; PSI आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:32 IST

जिल्ह्यात पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Beed Murder Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आठवडा उलटून गेल्यानंतरही गुन्ह्यातील सातपैकी फक्त तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. केजचा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केज शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.

संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी याआधीच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं आहे. अशातच पाटील हा हत्येची घटना होण्यापूर्वी आरोपी सुदर्शन घुले याला का भेटला होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि नराधम आरोपी यांच्या संगनमतानेच या हत्येचा कट रचला गेला का, असाही सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

पोलीस निरीक्षकावरही झाली आहे कारवाई

नागरिकांतील वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना हत्या प्रकरणानंतर सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यानंतर केज पोलीस ठाण्याची जबाबदारी जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आली.  

हत्येला पोलीसही जबाबदार?

बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी दुपारी ३ वाजता संतोष देशमुख यांचं घुले आणि इतर नराधमांनी अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांचे आत्येभाऊ याबाबतची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांनी तब्बल ३ तास अपहरणाची फिर्यादच नोंदवून घेतली नाही. शिवाय देशमुख यांच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. पोलिसांनी तात्काळ शोधाशोध केली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता," असा आरोप आमदार धस यांनी केला आहे.

आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय यंत्रणा कार्यरत?

मस्साजोग गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर हा वाद झाला त्या कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्किम कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे याची वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेली जवळीक बीड जिल्ह्यात चर्चिली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातपैकी फरार असलेल्या इतर चार आरोपींना वाचवण्यासाठी पडद्याआडून कोणती राजकीय यंत्रणा कार्यरत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण