शिवसंग्रामच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:53+5:302021-07-19T04:21:53+5:30
बीड : आ. विनायक मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रकाश पांडुरंग ...

शिवसंग्रामच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
बीड : आ. विनायक मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रकाश पांडुरंग जाधव यांची शिवसंग्राम पेठ बीड विभाग प्रमुखपदी तर मधुकर विश्वंभर हाटवटे यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले. शिवसंग्राम भवन, बीड येथे शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन व शिवसंग्रामचे विचार आत्मसात करून सर्वांना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी रामहरी मेटे यांनी शुभेच्छा देताना सांगितले. या अनुषंगाने जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मेटे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहाेचवावे व पक्षवाढीसाठी कार्यरत रहावे अशा सूचना दिल्या.
याप्रसंगी प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम शहराध्यक्ष लक्ष्मण ढवळे, सुहास पाटील, विनोद कवडे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीरा डावकर, साधना दातखीळ, अनिकेत देशपांडे, सुनील शिंदे, शिवराम शिरगिरे, पंडित शेंडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
170721\545517bed_22_17072021_14.jpg
शिवसंग्रामच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.