वीज सुरळीत पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:34 IST2021-05-18T04:34:53+5:302021-05-18T04:34:53+5:30

गतिरोधकाची दुर्दशा बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरूस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे ...

Provide electricity smoothly | वीज सुरळीत पुरवा

वीज सुरळीत पुरवा

गतिरोधकाची दुर्दशा

बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरूस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

भिंती रंगलेल्याच

अंबाजोगाई : शासकीय कार्यालयाच्या भिंतींवर ‘येथे थुंकू नये’ अशा सूचना लिहिलेल्या असतात; परंतु त्याच शासकीय कार्यालयातील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते.

नागरिकांची कसरत

अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील पाणंद रस्ते परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. ते दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

वाळू उपसा सुरूच

बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्यावेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात आहे.

Web Title: Provide electricity smoothly