महागाईविरोधात माकपची तहसीलसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:56+5:302021-06-18T04:23:56+5:30

दिल्लीत सत्तेत आलेले सरकार जातिवादाला खत-पाणी घालत शेतकरी विरोधी धोरणे राबवीत सुटले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई भरमसाट वाढली ...

Protests in front of CPI (M) tehsils against inflation | महागाईविरोधात माकपची तहसीलसमोर निदर्शने

महागाईविरोधात माकपची तहसीलसमोर निदर्शने

दिल्लीत सत्तेत आलेले सरकार जातिवादाला खत-पाणी घालत शेतकरी विरोधी धोरणे राबवीत सुटले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई भरमसाट वाढली असून, सामान्यांना जगणे असह्य झाले आहे. दमनशाही करीत कृषी कायदे पारित केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तहसीलवर कूच केले. आंदोलनात माकपचे तालुका सचिव कॉम्रेड सय्यद मुसद्दीक बाबा, कॉ. शिवाजी कुरे, कॉ. सय्यद याकुब, कॉ. मोहन जाधव, कॉ. सादिक पठाण, कॉ. बळिराम भुशे, कॉ. मस्तकिम शे. कॉ. शे. अन्नू, कॉ. सुहास झोडगे, कॉ. भगवान पवार, कॉ. शेख मेहबूब, कॉ. एकनाथ सक्राते, कॉ दिनकर जोगडे, कॉ. सय्यद रफिक, कॉम्रेड कॉ. पप्पू हिवरकर, कॉ. शांतीलाल पटेकर, कॉ. स. फिरोज, आदी सहभागी होते.

लक्षवेधी रॅली

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात माजलगाव माकपच्या वतीने तहसील कार्यालयावर मोटारसायकल निदर्शने रॅली काढण्यात आली. अग्रभागी रिक्षावर ठेवलेली गॅस टाकी, खाद्यतेलाचे डबे लक्ष वेधत होते. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करा, शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची तत्काळ मदत जाहीर करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

===Photopath===

170621\purusttam karva_img-20210617-wa0037_14.jpg~170621\purusttam karva_img-20210617-wa0038_14.jpg

Web Title: Protests in front of CPI (M) tehsils against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.