केजमध्ये आंदोलकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:58+5:302021-06-27T04:21:58+5:30

केज : ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शनिवारी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार नमिता ...

Protesters arrested in cage | केजमध्ये आंदोलकांना अटक

केजमध्ये आंदोलकांना अटक

केज : ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शनिवारी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे नंदकिशोर मुंदडा, योगिनी थोरात, विजयकांत मुंडे, दत्ता धस, संदीप पाटील, अनिता केदार, ऋषिकेश आडसकर, मुरलीबप्पा ढाकणे, रमाकांत मुंडे, वासुदेव नेहरकर, प्रवीण देशपांडे, भगवान केदार, विष्णू घुले, महादेव सूर्यवंशी, सुनील घोळवे उपस्थित होते.

आमदार मुंदडा यांनी राज्यातील आघाडी सरकारने झोपेचे सोंग घेतल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. मराठा समाजाचे आरक्षणही रद्द झाले आहे. त्यामुळे सर्वांना त्रास द्यायचे धोरण राज्य सरकारने अवलंबले असल्याची टीका केली. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दुलाजी मेंढके यांना आमदार मुंदडा यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

===Photopath===

260621\img_20210626_121552.jpg

===Caption===

केज येथील चक्का जाम आंदोलनात बोलताना आ.नमिता मुंदडा.

Web Title: Protesters arrested in cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.