तहसीलदारांच्या खुर्चीला हार घालून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:08+5:302021-06-17T04:23:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : केंद्र सरकार पेट्रोल, गॅस, डिझेलसह खाद्यतेलाची सतत दरवाढ करीत आहे. याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन ...

तहसीलदारांच्या खुर्चीला हार घालून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : केंद्र सरकार पेट्रोल, गॅस, डिझेलसह खाद्यतेलाची सतत दरवाढ करीत आहे. याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बुधवारी तहसीलसमोर निदर्शने केली. निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार हजर नसल्याने, तहसीलदारांच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदविला.
केंद्रातील भाजप सरकारने डिझेल, पेट्रोल व खाद्यतेल आणि घरगुती गॅसची दरवाढ करून, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. सरकारच्या महागाईच्या धोरणाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर बुधवारी निर्दशने केले. पक्षाचे अध्यक्ष सिद्धार्थ ससाणे, तालुकाध्यक्ष राकेश साळवे हे निदर्शनानंतर निवेदन देण्यासाठी गेले असता, निवदेन स्वीकारण्यासाठी तहसीलदार हजर नसल्याने, पक्षाच्या वतीने तहसीलदारांच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदविला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.