केंद्र सरकारला गोवऱ्या पाठवून गॅस दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST2021-09-05T04:37:28+5:302021-09-05T04:37:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मोदी सरकार चले जाव..च्या घोषणा देत बीड जिल्हा ...

Protest against gas price hike by sending govars to central government | केंद्र सरकारला गोवऱ्या पाठवून गॅस दरवाढीचा निषेध

केंद्र सरकारला गोवऱ्या पाठवून गॅस दरवाढीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मोदी सरकार चले जाव..च्या घोषणा देत बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे परळीत शनिवारी जिल्हाध्यक्ष संगीता तुपसागर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला गोवऱ्या भेट देऊन आंदोलन केले.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिला आघाडीने केंद्र सरकारच्या नागरिक विरोधी धोरणाविरोधात सतत आंदोलन करीत आहेत. आंदोलनात वर्षा रायभोळे, चित्रा देशमुख, शोभा जंगले, अर्चना रायभोळे, ज्योती कांबळे, शोभा लांडगे, वैजयंता धांडोरे, भारती आसेकर, सुरेखा पैठणे, शोभा भोसले, सोना व्हावळे, कांताबाई वाघमारे, लक्ष्मीबाई पारके, शांताबाई कसबे, सुरेखा होके, रमा गायकवाड, रमा मुंढे, मंगलाबाई माने, सविता बलाळ आदी महिला सहभागी होत्या.

040921\img-20210904-wa0400_14.jpg

परळीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने केंद सरकारला गोव-या पाठवून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.

Web Title: Protest against gas price hike by sending govars to central government