एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे, कोरोनाकाळात हाल - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:14+5:302021-07-27T04:35:14+5:30

बीड : शहरातील विविध भागात एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांचे कोरोना काळात हाल झाल्याची परिस्थिती आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील ...

Protection of the elderly living alone Rambharose, coronal period - A | एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे, कोरोनाकाळात हाल - A

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे, कोरोनाकाळात हाल - A

बीड : शहरातील विविध भागात एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांचे कोरोना काळात हाल झाल्याची परिस्थिती आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील त्यांच्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसून एकाही ठाण्यात त्यांच्या हद्दीतील वृद्धांच्या संख्येची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना काळात या एकट्या राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे असून, त्यांना आधाराची गरज आहे.

जिल्ह्यातील शहरांमध्ये अनेक वृद्ध एकटे राहटेच राहात आहेत. यामध्ये महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे. मुले-सुना नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. काहींचे परदेशात असतात. त्यामुळे या वृद्धांना कोरोनाकाळत अनेक गोष्टींची गरज असतानादेखील त्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले. दरम्यान, अशा वृद्ध दाम्पत्यांवर लक्ष ठेवून त्यांना लुटण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत वृद्धांकडून व्यक्त केले जात आहे.

औषधी आणण्याचीही सोय नाही

लॉकडाऊनच्या काळात मेडिकल सुरू होते. मात्र, वाहतूक व्यवस्था बंद असल्याने वृद्धांची अवस्था बिकट झाली होती. काहीवेळा शेजारी व नातेवाईकांनी औषधी आणण्यासाठी मदत केली, तर काही वेळा त्यांनाच पायपीट करावी लागली.

पोलीस ठाण्यात वृद्धांची नोंद नाहीच

पोलीस ठाणे हद्दीतील एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या मदतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, तशा पद्धतीने कोणत्याच शहरातील वृद्धाची नोंद केली असल्याची माहिती मिळू शकली नाही.

पोलिसांकडून कायम होते मदत

पोलीस ठाण्यात वृद्ध नागरिक काही कारणास्तव आले तर, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही केली जाते. तसेच वृद्धांना कायम मदत करण्याचा हेतू पोलीस प्रशासनाचा असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही

मुलगा व सुना बाहेगावी राहात असल्याने एकटाच राहतो. इतर वेळा सहसा त्रास होत नाही. पण कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणी समोर उभ्या आहेत. पैसे असूनदेखील जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. पोलीस ठाण्यात याविषयी मदत मागितली नाही. परंतु, शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी मदत केल्यामुळे दोन्ही लाटेत आम्ही सुखरूप आहोत. एक वृद्ध, केज

मुले सुनांना घेऊन वेगळे राहतात. ते माझ्याजवळ राहत नाहीत. काही व्याधी नसल्यामुळे अद्याप कसला त्रास नाही. मात्र, माझ्यासारख्या अनेक वृद्धांचे हाल आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. मदत कोणाकडे मागावी, हेदेखील त्यांना कळत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. एक वृद्ध, बीड

Web Title: Protection of the elderly living alone Rambharose, coronal period - A