शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

बीडमध्ये महायुतीच्या मेळाव्यात वाद; बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने प्रीतम मुंडे संतापल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 21:29 IST

Beed Politics News: बीडमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडेचा फोटो नसल्याने मोठा वाद झाला.

Beed Pritam Munde : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. यंदाची निवडणूक महायुतीतून लढवली जाणार आहे. यासाठी भाजप, शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) राज्यभर जिल्हानिहाय मेळावे आयोजित करत आहे. आज बीडमध्येही महायुतीचा मेळावा झाला. पण, यावेळी बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.

बीडमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवरुन खासदार प्रीतम मुंडे नाराज झाल्या. याचे कारण म्हणजे, महायुतीच्या बॅनरवर भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांचा फोटो नव्हता. बॅनरवरुन भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यानंतर तात्काळ आयोजकांना बॅनर बदलावे लागले. 

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंचा फोटो वगळल्यानंतर भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. "आपला एखादा नेता हयात असताना त्याचा फोटो लावला नसेल तर कार्यकर्ते आक्रमक होतात. पण, आज आपला नेता हयात नसताना, कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, याला मी सलाम करते. मी अशा विषयावर कधी बोलत नाही, पण आता बोलावं लागतंय. हे करणारे कुणीही असो, कुठलाही पक्ष असो, अशा गोष्टीचे यापुढे स्वागत केले जाणार नाही." 

"ही भूमिका स्पष्ट करणे काळाची गरज होती. ज्या मुंडे साहेबांच्या नावाशिवाय राज्यात कुठलीही मोठी राजकीय घडामोड घडत नाही, त्यांचा फोटो प्रोटोकॉलमध्ये नाही, हे कारण पटणारे नाही. हा प्रशासकीय कार्यक्रम नव्हता, मग मुंडे साहेबांचा फोटो भाजपाच्या प्रोटोकॉल मध्ये का येत नाही? यापुढे मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही," असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या. 

टॅग्स :BJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना