शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

पॅरेलवरील कैदी दोन वर्षांपासून फरार; दोनदा हुलकावणी दिली, अखेर एका हॉटेलात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 19:50 IST

पॅरेलवर आल्यानंतर फरार असलेला कैदी पकडला, अंभोरा पोलिसांची कारवाई 

- नितीन कांबळेकडा (बीड): पॅरेल रजेवर कारागृहातून बाहेर आल्यानंतर २०२२ पासून दिलेल्या कालावधीत परत न जाता पोलिसांना गुंगारा देत असलेल्या फरार कैद्याला अंभोरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून मंगळवारी सायंकाळी ठाणे येथून अटक केली आहे. अमीर सय्यद ( रा.शिरापूर ता.आष्टी) असे पकडलेल्या कैद्याचे नाव असून तो ठाण्यातील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता.

आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील अमीर सय्यद हा आष्टी पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या एका खून प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सन २०२२ मध्ये तो कारागृहातून पॅरेल रजेवर बाहेर आल्यानंतर ठरलेल्या कालावधीत परत न जाता फरार झाला होता. त्याच्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. २० ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरील कैदी हा ठाणे हद्दीतील एका हाॅटेल मध्ये असल्याचे अंभोरा पोलिसांना समजले. यावरून सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह जात कैद्याला २० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान मोठ्या शिताफीने पकडून अटक केली. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर याच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, शरद पोकळे यानी केली.

दोन वेळा पोलिसांना दिली हुलकावणी सदरील कैदी एका ठिकाणी असल्याची दोन वेळा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा लावला होता पण तो दोन वेळेस हुलकावणी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. सदरील कैद्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे सोडण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी