शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बीडच्या कारागृहात कैद्याने केला दुस-यांदा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 7:42 PM

येथील कारागृहात बंदिस्त असलेला सराईत गुन्हेगार मोहन मुंडे (रा. अंबाजोगाई) याने शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली. यापूर्वीही त्याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

बीड : येथील कारागृहात बंदिस्त असलेला सराईत गुन्हेगार मोहन मुंडे (रा. अंबाजोगाई) याने शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली. यापूर्वीही त्याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर राज्यासह परराज्यात चोरी, दरोडा, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मोहन मुंडे हा बालवयातच गुन्हेगारीकडे वळला. सुरुवातीलाच त्याने अंबाजोगाईसह परिसरात गुन्हे केले. त्यानंतर त्याने परराज्यातही गुन्हे केले. या प्रकरणी त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अशातच मागील दीड वर्षांपूर्वी पुण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. यासह अन्य काही गुन्ह्यांमध्ये तो बीडच्या कारागृहात बीड कारागृहात बंदिस्त होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास तो शौचासाठी गेला असता अज्ञात वस्तूने त्याने स्वत:च्या अंगावर वार करून घेतले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दोन वेळेस पलायनमोहन हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांना कसा चकवा द्यायचा, याबाबत तो ज्ञात आहे. चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला चार वर्षांपूर्वी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने हातकडीसहित पलायन केले. त्यानंतर अंबाजोगाई ठाण्यातूनही त्याने गुटख्याच्या पुडीने हातकडी उघडून पळ काढला होता. त्याची अंबाजोगाई शहरात दहशत निर्माण झाली होती. तसेच ज्या पोलीस कर्मचार्‍याने त्याला पकडले त्याच्यावर तो वेगवेगळे आरोप करून ब्लॅकमेल करीत असल्याचे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले.