शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

आष्टीत जुगार अड्ड्यावर छापा; १५ जुगाऱ्यांवर विशेष पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:08 AM

शिराळ शिवारातील शेतात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल,अलिशान गाड्यांसह ३० लाखांचा माल जप्त केला.

आष्टी : शिराळ शिवारातील शेतात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल,अलिशान गाड्यांसह ३० लाखांचा माल जप्त केला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचे पथक सोमवारी आष्टीत दाखल झाले होते.यादरम्यान त्यांना शिराळ शिवारातील पंजाब कासम आजबे यांच्या शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री ८ वाजता सदर शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला असता तिथे गोटिराम आजबे, कचरु आजबे, रमेश धोतरे, संजय वाल्हेकर, बाळासाहेब राळेभात, मच्छिंद्र मसाळकर, विलास कर्डुले, राजेंद्र वंजारे, नासीरखन गुलाबखन, बापु थोरात, महावीर भंडारी, विकास जगताप, लहु बहिर, पोपट पोकळे आणि रावसाहेब जगताप हे १५ जण गोलाकार बसून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना दिसून आले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख १ लाख १४ हजार २४० रुपये, एकूण ९४ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल, सात दुचाकी तसेच आॅडी, स्कॉर्पियो या चारचाकी वाहनासह एकूण २९ लाख ३८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पो.ना. पांडुरंग देवकते यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद झाला.विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे, पोलीस कर्मचारी गणेश नवले, रेवननाथ दुधाने, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, हनुमान राठोड आदींनी केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed S Pपोलीस अधीक्षक, बीड