पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:53+5:302021-06-02T04:25:53+5:30

कोरोना लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिक व फेरीवाल्यांचे व्यवसाय मोडकळीस आले आहेत. लॉकडाऊन असल्याने घर चालवणे अवघड झाले होते. त्यातच अनेकांचे ...

The Prime Minister should take advantage of the self-reliant Swanidhi Yojana | पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा

पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा

कोरोना लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिक व फेरीवाल्यांचे व्यवसाय मोडकळीस आले आहेत. लॉकडाऊन असल्याने घर चालवणे अवघड झाले होते. त्यातच अनेकांचे भांडवल घर खर्चात खर्च झाले. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा व्यावसायिकांकडे भांडवल शिल्लक राहिलेले नाही. ही परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये अर्जदाराला प्राथमिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज स्वरूपात दिले जातात, या कर्जाला वर्षभराची फेड आहे. बारा महिन्यात कर्जदाराने नियमित परतफेड केली तर शासनामार्फत दुसऱ्या वर्षात वाढीव कर्ज देण्याची सुविधा आहे. या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यावसायिकांची शासकीय नोंद होत आहे. नोंदणीकृत व्यावसायिक होण्यासाठी आपली नोंदणी करून या योजनेचा लाभ व्यावसायिकांनी घ्यावा. असे आवाहनही शेख यांनी केले आहे.

Web Title: The Prime Minister should take advantage of the self-reliant Swanidhi Yojana