भाव आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:33+5:302021-01-13T05:26:33+5:30
स्वच्छता होईना बीड : शहरातील अनेक ठिकाणी तसेच सहयोगनगर, स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. यामुळे ...

भाव आवाक्यात
स्वच्छता होईना
बीड : शहरातील अनेक ठिकाणी तसेच सहयोगनगर, स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी वाढतच चालली आहे. हा कचरा पालिकेतर्फे नियमित सफाई केला जात नसल्याने यात आणखी भर पडत आहे.
दुरुस्ती करा
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.
सिग्नल बंद अवस्थेत
बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेक वेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होती, परंतु दुरुस्ती झालेली नाही.
पिकांवर कीड
बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रबी पिके बहरू लागली आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे परिणामी या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे.