डासांचा प्रादुर्भाव वाढला, धूर फवारणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:44+5:302021-03-13T04:58:44+5:30
एकीकडे कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागात आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, ...

डासांचा प्रादुर्भाव वाढला, धूर फवारणीची मागणी
एकीकडे कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागात आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनाबाबत व्यापक मोहीम सुरू असताना डासांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरात ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या भागात नगर परिषद प्रशासनाने धूर फवारणी करावी व डासांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे मलेरिया, थंडी, ताप व इतर आजारांना आळा बसेल, असे नागरिकांचे मत आहे. अंबाजोगाई शहरात काही महिन्यांपूर्वी धूर फवारणी करण्यात आली. त्यानंतर मागणी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी अनेक भागात थंडी तापाची साथ निर्माण झाली होती. यासाठी शहरात धूर फवारणी आवश्यक आहे. शहरातील अनेक मोठमोठ्या नाल्यांवर झाकण नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. हा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे यांनी केली आहे.