सुंदर माझे कार्यालयांतर्गत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:36+5:302021-03-07T04:30:36+5:30
बीडमध्ये सुंदर माझे कार्यालय ही माेहीम राबविली जात आहे. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सदृढ रहावे, यासाठी जि.प.अंतर्गत असलेल्या सर्वच ...

सुंदर माझे कार्यालयांतर्गत आरोग्य तपासणी
बीडमध्ये सुंदर माझे कार्यालय ही माेहीम राबविली जात आहे. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सदृढ रहावे, यासाठी जि.प.अंतर्गत असलेल्या सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे शनिवारी जिल्हाभरात २५ ठिकाणी पथके नियुक्त करून आरोग्य तपासणी करण्यात आली. एका पथकात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
दरम्यान, बीड शहरात पंचायत समिती व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.मिर्झा बेग, डॉ.राेहिणी ढगे, मनेंद्र बागलाने आदींची उपस्थिती होती.
कोट
जिल्हाभरात शनिवारी जि.प.अंतर्गतच्या सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी विशेष पथके नियूक्त केले होते. सुंदर माझे कार्यालय अंतर्गत ही तपासणी करण्यात आली.
डॉ.नरेश कासट, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
===Photopath===
060321\062_bed_9_06032021_14.jpeg
===Caption===
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांची आरोग्य तपासणी झाली. यावेळी डॉ.नरेश कासट, डॉ.एल.आर.तांदळे,डॉ.बेग, बागलाने आदी